
इस्लामाबाद, दि. 13 – गेल्या काही दिवसापासून ग्रहमान फिरलेले पाकीस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना आज 2006 मध्ये बलूचिस्तान नेते अकबर बुगती यांच्या मृत्युप्रकरणी अधिकृतरित्या अटक करण्यात आली. त्यामुळे, पाकीस्तानात परतून पुन्हा अध्यक्ष होण्याची स्वप्ने पाहणार्या मुशर्रफ यांना इस्लामाबादेतील सबजेलमध्ये रुपांतर करण्यात आलेल्या आपल्या फार्महाऊसवरच राहावे लागणार आहे. त्यांना 15 दिवसांची न्यायालयिन कोठडी सुनावण्यात आली आहे.
