वॉशिग्टन दि.१३ – अमेरिकेचे प्रेसिडेंट बराक ओबामा यांना संवेदनशील गुप्तवार्ता संबंधी सल्लागार म्हणून काम करत असलेल्या अव्हरील हेन्स यांची अमेरिकेच्या सीआयए या गुप्तचर संस्थेच्या उपसंचालकपदी नेमणूक करण्यात आली आहे. ओबामा यांनी हेन्स यांचे नांव जाहीर केले असून या पदावर पहिल्यांदाच एक महिला नेमली गेली आहे.
४३ वर्षीय अव्हरील हेन्स नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलच्या सल्लागार म्हणूनही कार्यरत असून त्या अमेरिकेतील टॉप लॉयर म्हणून ओळखल्या जातात. मायकेल मोरेल यांच्या जागी आता त्या सीआयए उपसंचालक म्हणून काम पाहणार आहेत. सीआयए ने हेन्स यांच्या निवडीचे स्वागत केले आहे.
हेन्स यांनी यापूर्वी अनेक प्रशासकीय जबाबदार्या यशस्वीपणे पार पाडल्या असून सध्या त्या प्रेसिडेंट च्या लिगल अॅडव्हायझर म्हणूनही काम करत आहेत. ओबामा त्यांची निवड जाहीर करताना म्हणाले की अव्हरील उत्तम वकील आहेच पण तिचे जजमेंट अचूक आणि गुप्तवार्ता विभागाचा तिला चांगला अनुभवही आहे. या पदावर कार्यरत असलेल्या ५४ वर्षीय मोरेल यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर हे पद रिकामे झाले होते.