पुणे, दि.१३ – येत्या जुलै महिन्यापासून बालेवाडीत होणार्याआ आशिया एथलीट चँपीयनशीप’च्या आयोजनासाठी राज्य सरकारने १८ कोटी रुपये मंजुर केले आहेत. या खेळात आशिया खंडातील ४५ देशांचा सहभाग असेल. त्यांच्या सर्व व्यवस्थांसाठी हा निधी मंजुर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दिल्ली आणि तामीळनाडू सरकारने या स्पर्धेचे आयोजन करण्यास नकार दिला होता.
बालेवाडीत जुलैत आशिया एथलिट चॅम्पियनशिप
श्रीलंकेचे खेळाडूं सहभागी होत असल्याच्या भीतीने तामिळनाडू सरकारने या आशियाई एथलीट स्पर्धांच्या आयोजनास नकार दिला होता. तर कॉमन वेल्थ खेळांचा डाग अजुनही कायम असल्यामुळे दिल्ली सरकारनेही ऐन निवडणुकांच्या तोंडावर ह्या स्पर्धा आयोजित करण्यास असमर्थता दाखवली आहे. दोन्हीकडून नकार घंटा वाजत असताना आज महाराष्ट्र सरकारने या स्पर्धा भरवण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीत या स्पर्धेसाठी १८ कोटी रुपयांचा निधीही मंजुर करण्यात आला आहे. परंतु नुकतेच महाराष्ट्रात मान्सूनने आगमन केले आहे त्यातच या स्पर्धेसाठी केवळ दोन महिने बाकी आहेत. त्यामुळे या पावसामध्ये महाराष्ट्र सरकार ही तयारी कशा प्रकारे पूर्ण करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.