नवी दिल्ली दि. १३- अमेरिकेतील कूपर टायर्स या बलाढ्य कंपनीचे भारतातील अपोलो टायर्स अधिग्रहण करत असून कूपर टायर्स ही रबर कंपनी २.५ अब्ज डॉलर्सला विकत घेतली जाणार आहे. भारतीय रूपयांत ही किमत आहे १४,५०० कोटी रूपये. हा करार पूर्णत्वास गेल्यानंतर अपोलो टायर्स ही जगातील सातव्या नंबरची टायरमेकर कंपनी ठरणार आहे.
या विषयी माहिती देताना अपोलो टायर्सचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नीरज कन्वर म्हणाले की हा सर्व व्यवहार रोखीने केला जाणार आहे. हे डील भारतीय वाहन उद्योगातील सर्वात मोठे डिल आहे. यापूर्वी टाटा मोटर्सने जग्वार लँड रोव्हर २००८ साली २.३ अब्ज डॉलर्सला खरेदी केली होती. कूपर ही प्रिमियम लिस्टेड कंपनी आहे मात्र या करारानंतर ती डिलिस्ट केली जाईल आणि तिची संपूर्ण मालकी अपोलोकडे येणार आहे.
अपोलोचा सध्या व्यवसायातील महसूल भारतात ६० टक्के इतका आहे मात्र कूपर टायर्सच्या अधिग्रहणानंतर भारतातून २२ टक्के, यूएसमधून ४४ टक्के, चीनमधून १८ टक्के तर युरोप व बाकी जगभरातून उर्वरित महसूल कंपनीला मिळणार आहे.