गडचिरोली दि.१२ – गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांना शरण आलेल्या २७ माओवाद्यांपैकी जीवन आणि जानकी या दोघांनी पोलिस मुख्यालयातच लग्नगाठ बांधली. या विवाह समारंभाला वरीष्ठ पोलिस अधिकारी तसेच सीआरपीएफचे कमांडरही उपस्थित होते असे समजते.
शरण आलेल्या माओवाद्यांनी बांधली लग्नगाठ
जानकी उर्फ जानकी (वय २१) ही माओवादी तरूणी पोलिसांना शरण येण्यापूर्वी मार्च २००९ पासून चेतना नाट्य मंचाद्वारे संघटनेसाठी काम करत होती. ती भामरागड तालुक्यातील गोद्री या गावातील आहे. जीवन उर्फ सुरेंद्र हा माओवादी तरूण माओ कमांडर म्हणून २००३ पासून काम करत होता. कांही महिन्यांपूर्वी ते पोलिसांना शरण आले होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
पोलिसांनी पुरोहितांना बोलवून वैदिक परंपरेप्रमाणे त्यांचा विवाह पोलिस मुख्यालयातच लावून दिला. विशेष पोलिस महासंचालक अनुपमार सिंग आणि सीआरपीएफचे उपकमांडर कर्तार सिंग या दोघा वरीष्ठ अधिकार्यानी जीवन जानकीला आशीर्वाद दिले.