डुलकीमुळे कोट्यावधी डॉलर्स दुसर्‍याच्या खात्यात ट्रान्स्फर

बर्लीन दि.१२ – बँकेतील अति कामाने म्हणा किवा घरी झोप पुरती न झाल्याने म्हणा, एका बँक कर्मचार्‍याने कोट्यावधी डॉलर्सची रक्कम दुसर्‍याच ग्राहकाच्या खात्यात ट्रान्स्फर केली आणि त्या प्रकरणी बँकेतीत सुपरवायझर महिलेला दोषी धरून तिची नोकरी गेल्याची घटना जर्मनीत घडली. शेवटी प्रकरण न्यायालयात गेले आणि न्यायालयाने नोकरी गमवावी लागलेल्या महिला सुपरवायझरला दोषी न धरता केवळ समज देऊन तिची सुटका केली असे समजते.

या संबंधी समजलेल्या हकीकतीनुसार बँकेतील एक कर्मचारी कामात असताना त्याला प्रचंड पेंग आली आणि त्याचे डोके संगणकाच्या की बोर्डवर टेकले गेले. यावेळी हा कर्मचारी ६४.२० युरोची रक्कम एका ग्राहकाच्या खात्यातून ट्रान्स्फर करत होता. मात्र पेंगेमुळे त्याच्या डोक्याने की बोर्डवरील की दाबली गेली आणि २२ २२ २२ २२२ २ इतके वेळा हा आकडा दाबला गेला. परिणामी २९.३ कोटी डॉलर्सची रक्कम दुसर्‍याच खात्यात ट्रान्स्फर झाली. ही चूक सुपरवायझर महिलेच्या लक्षात आली नाही. मात्र अन्य कर्मचार्‍याच्या लक्षात ही चूक आली आणि ती त्वरीत निस्तरलीही गेली. मात्र संबंधित सुपरवायझर महिलेला त्यासाठी जबाबदार धरण्यात आले आणि तिची नोकरी गेली.

नंतर या महिलेने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आणि न्याय मिळविला.