पाकिस्तान, द. आफ्रिकेची आज असितत्वासाठी झुंज

बर्मिगहॅम- चँपियन्स ट्रॉफीत ‘बी ग्रूप’मध्ये सोमवारी पाकिस्तानची लढत दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. दोन्ही संघाला सुरुवातीच्या सामन्यात पराभव सहन करावा लागला आहे. त्यामुळे स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी दोन्ही संघांना या सामन्यात विजय आवश्यक असल्याने हा सामना ‘ करो या मरो’ ठरणार आहे.

पाकिस्तानला वेस्ट इंडिजकडून दोन विकेटनी पराभूत व्हावे लागले. तर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर २६ धावांनी विजय मिळवला. अपयशी सलामीनंतर गेल्या दोन लढतीतील चुका टाळण्याचे आव्हान दोन्ही संघांसमोर आहे.

माजी विजेत्या दक्षिण आफ्रिकेला दुखापतींनी सतावले आहे. डेल स्टेन आणि मॉर्नी मॉर्केलच्या अनुपस्थितीत दक्षिण आफ्रिकेचा तेज मारा बोथट झाला आहे. मॉर्केलच्या जागी आलेला नवोदित ख्रिस मॉरिस पाकिस्तानविरुद्ध वनडे पदार्पण करण्याची शक्यता आहे. गोलंदाजीची समस्या मोठी असल्याचे सलामीला प्रकर्षाने जाणवले.भारताविरुद्ध ‘डेथ ओव्हर्स’मध्ये त्यांना धावा रोखता आल्या नाहीत. फलंदाजीतकर्णधार एबी डेविलियर्स, रॉबिन पीटरसन आणि रायन मॅक्लॅरेनने हशिम अमला आणि कॉलिन इन्ग्रॅम आणि जेमी दुमिनीकडून त्यांना चांगली साथ अपेक्षित आहे.

तर दुसरीकडे पाकिस्तानला फलंदाजांचा फॉर्म त्यांना सतावतेय. कर्णधार मिसबा-उल-हक आणि सलामीवीर नसिर जमशेद वगळता विंडिजविरुद्ध सर्व प्रमुख गोलंदाजांनी निराशा केली. त्यामुळे अपेक्षित धावसंख्या फलकावर लागली नाही. मोहम्मद इरफानसह सईद अज्मल आणि वहाब रियाझने प्रभावी मारा केला. मात्र धावा कमी असल्याने गोलंदाजांचे प्रयत्न तोकडे पडले. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment