फॅशन डिझायनर मांजरीच्या प्रेमात

बर्लिन दि.१० – जर्मनीमधील फॅशन डिझायनर कार्ल लेगरफेल्ड प्रेमात पडले आहेत. त्यांना लग्नही करण्याची इच्छा आहे. यात विशेष नवल नाही. पण खरे नवल पुढेच आहे. लेगरफेल्ड हे कुठल्याही स्त्रीच्या प्रेमात पडले नसून ते पडले आहेत पांढर्याल गुबगुबीत सयामी मांजरीच्या प्रेमात. त्यांना याच मांजरीशी लग्नंही करायचे आहे. या मांजरीचे नाव आहे ’चोपेट’.

लॅगरफेल्ड यांची मांजरही कुठल्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. या मांजरीचे टिवटर अकाउंट असून तिचे २७,००० फॉलोअर्स आहेत.

जागतिकीकरणाच्या काळात आंतरजातीय, आंतरधर्मिय, आंतरराष्ट्रीय विवाह या अत्यंत सामान्य गोष्टी बनल्या आहेत. आता तर समलैंगिक विवाहांवरही वाद सुरू झाले आहेत. अशात जर्मनीमध्ये फॅशन डिझायनर कार्ल लेगरफेल्ड यांना आपल्या मांजरीशी लग्न करावेसे वाटले तर चूक काय?

’माणूस आणि जनावरांची लग्ने होत नाहीत. मलाही कधी वाटले नव्हतं, की मी कधी एका मांजरीच्या इतका प्रेमात पडेन.’ असे लेगरफेल्ड यांनी ’न्यूयॉर्क पोस्टला सांगितले आहे.

Leave a Comment