फ्रेंच ओपनमध्ये नदालला फेररचे आव्हान

पॅरिस: पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये फ्रेंच ओपनचा सातवेळा विजेता ठरलेला राफेल नदाल व डेव्हिड फेरर या स्पेनच्याच दोन खेळाडूंमध्ये मुकाबला रंगणार आहे. राफेल नदालने यापूर्वी सातवेळा फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकाविले आहे. फ्रेंच ओपनमध्ये जेतेपदासाठी स्पॅनिश बॅटल रंगणार आहे. आठव्यांदा फ्रेन्च ओपनची ट्रॉफी उचलून एकाच ग्रँड स्लॅम स्पर्धेत सर्वाधिक जेतेपदं मिळवण्याचा विक्रम करण्याची संधी नदालकडे आहे. त्यामुळे या स्पर्धेत कोण जिंकणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

उपांत्य फेरीत सर्बियाच्या नोवाक जोकोविचला नदालने हरवले आणि फायनलमध्ये धडक मारली. वर्ल्ड नंबर वन जोकोविचबरोबरची ही लढाई पाच सेट्सपर्यंत रंगली. चार तास आणि ३७ मिनिटं झुंज दिल्यावर नदालने ६-४, ३-६, ६-१, ६-७ आणि ९-७ अशी बाजी मारली.

नदालने कारकीर्दीत आठव्यांदा फ्रेन्च ओपनची अंतिम फेरी गाठली आहे. याआधी सातवेळा तो विजेता ठरला होता. आता आठव्यांदा फ्रेन्च ओपनची ट्रॉफी उचलून एकाच ग्रँड स्लॅम स्पर्धेत सर्वाधिक जेतेपदं मिळवण्याचा विक्रम करण्याची संधी नदालकडे आहे.

दुस-या उपांत्य सामन्यात चौथ्या मानांकित फेररने फ्रान्सच्या जो विल्फ्रेड सोंगावर ६-१, ७-६ , ६-२ अशी मात केली. ३१ वर्षीय फेररने कारकीर्दीत पहिल्यांदाच एखाद्या ग्रँड स्लॅम स्पर्धेची फायनल गाठली आहे. त्यामुळे या स्पर्धेत कोण बाजी मारणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

Leave a Comment