इंग्लडची कांगारूवर मात

कॉर्डीफ – चाम्पियान ट्रॉफी स्पर्धेतील साखळी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लडने २६९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. २६९ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला २२१ धावांपर्यंत मजल मारली. या सुरुवातीच्या सामन्यातच कांगारूचा पराभव झाल्याने स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी आगामी काळातील दोन सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे.

नाणेफेक जिंकून इंग्लडने प्रथम फलंदाजी करताना ६ गडी गमावून २६९ धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून अलेस्टर कूक (३०), बेल (९१), बोपारा नाबाद (४६) यांची महत्त्वाची कामगिरी ठरली. अडरसनने तीन विकेट घेत इंग्लकडून वनडेत सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरला.

२७० धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार बेली ह्युज (५५) याने एकाकी झुंज देत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो असफल ठरला. पीटर ह्युज (३०), शेन वॉटसन(२४), यांच्या कामगिरीच्या बळावर ऑस्ट्रेलियाला २२१ धावांपर्यंत मजल मारली. फलंदाजमध्ये जॉन्सन आणि फॉकनर यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.

Leave a Comment