मुलीच्या बाथरूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याचे उघड

अलवर- देशभरात बलात्काराच्या गंभीर घटना घडत असतनाच अजून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राजस्थानतील भरतपूर जिल्ह्यातील ‘ओम साई नाथ’ या मुलीच्या वस्तीगृहाच्या प्रसाधनगृहात (बाथरूम) सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याचे उघड झाले आहे. हा प्रकार समजल्यानंतर पोलिसांनी तत्काळ या वसतीगृहाला ताळे ठोकले आहेत. या वस्तीगृहात राहणा-या मुलींना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.

या वसतीगृहाचे येथील जिल्हाधिकारी नीरज के. पवन यांच्या नेतृत्वाखाली प्रशासकिय अधिका-यांच्या एका टीमने परीक्षण केले. त्यावेळी त्यांना वसतीगृहाच्या बाथरूममध्ये सीसीटिव्ही तीन कॅमेरे आढळले. तत्काळ हे कॅमेर काढून घेण्यात आले असून वसतीगृहातील लॅपटॉप, कम्प्युटर, सीडी तपासणीसाठी फोरेन्सीक लॅबमध्ये पाठवण्यात येणार आहे.

ओम साई नाथ’ या मुलीच्या वस्तीगृहात राहणा-या अनेक मुलींना या ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात आल्याचे माहित नव्हते. सीसीटिव्हीतील आक्षेपार्ह चित्रण तपासानंतर नष्ट केले जाईल तसेच यातील कोणतेही चित्रण बाहेर येणार नाही याची दक्षात फॉरेन्सीक विभागाकडून घेतली जाणार आहे. या प्रकाराने सर्वत्र खळबळ माजली आहे.

Leave a Comment