बीड – बीड जिल्ह्यात दोन ठिकाणी वीज पडल्याने चार जणांचा मृत्यू झाला. या घटनेत चार जण गंभीररित्या जखमी झाले. त्यासोबतच चार शेळयांचा मृत्यू झाला. वादळी वा-यासह शनिवारी दुपारी वादळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.

बीड जिल्ह्यातील जैतापूर ( ता . धारूर ) येथे पाऊस येत असल्याने झाडाखाली थांबलेल्यांच्या अंगावर वीज पडल्याने तीन जणांचा मृत्यू झाला. कोंडाबाई माणिक दराडे ( वय ४५ ), पांडुरंग अंगद दराडे ( वय ८ ), अंगद ज्ञानोबा दराडे ( वय ३० ) अशी मरण पावलेल्याची नावे आहेत. यामध्ये चार जण गंभीररित्या जखमी झाले तर, चार शेळ्यांचा मृत्यू झाला. जखमींना उपचारासाठी बीड येथील हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यातील दुस-या एका घटना सुर्डी ( ता . बीड ) येथे घडली. वादळी पाऊस येत असल्याने आडोशासाठी शेतातील झाडाखाली थांबलेलेल्या मंदाकिनी कैलास थोटे या महिलेचा अंगावर वीज कोसळल्याने मृत्यू झाला. दरम्यान, मराठवाड्यात वीज कोसळून जीवित हानी होण्याचे प्रमाण जास्त असल्याने सरकारने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे.