जियाने लिहलेले पत्र सापडले

बॉलीवुडची फेमस हीरोइन जिया खानच्या आत्महत्येनंतर चार दिवसांनी तिने लिहलेले पत्र सापडले आहे. जियाच्या आईला तिच्या रूमची सफाई करीत असताना एक चिठी सापडली सापडली आहे. तिच्या खोलीत सापडलेले हे सहा पानी पत्र जियाने मृत्यूपूर्वी लिहले होते असे जियाच्या कुटुंबाचे मत आहे.

या पत्रामध्ये जियाच्या बिघडलेल्या नात्या संबधी लिहले आहे. या पत्रात तिने कोणाचे नाव लिहले नाही. मात्र माहित नसलेल्या ब-याच गोष्टी तिने या या पत्रात लिहल्या आहेत. तिच्या कुटूंबाने हे पत्र पोलिसांच्या हवाली केले आहे. दरम्यान पोलिस या पत्रातील हस्त अक्षर कोणाचे आहेत याची ओळख पटवीत आहे. आता या पत्रामुळे पोलिसांना तपास करणे सोपे झाले आहे.

जिया खानचे शेवटचे बोलणे सूरज पंचोली सोबत झाले होते. गेल्या एक वर्षापासून जिया आदित्‍य पंचोलीचा मुलगा सूरज पंचोली सोबत ती डेट करीत होती. याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे यापूर्वीच सूरज पंचोली याची चौकशी पोलिसांनी केली आहे.

Leave a Comment