गेल्या तीन वर्षांपासून अभिनेता कुणाल खेमू सोबत अभिनेत्री सोहा अली खान हिचे प्रेमसंबध आहेत. त्यामुळे प्रत्येक क्षण रोमांस पूर्ण असतो. गेल्या काही दिवसांपासून दोघेपण लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा आहे. काही दिवसापूर्वीच कुणाल खेमू सोबत सोहा अली खान ही सुट्टी घेऊन परदेशात गेली होती.
नुकतीच अभिनेत्री सोहा लोनली प्लेनेट अवार्ड्स या कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी बोलताना सोहा म्हणाली, ‘ कुणाल सोबतचा प्रत्येक परदेश दौरा अथवा प्रत्येक दिवस आणि प्रत्येक क्षण हा रोमांटिक असतो. तो जवळ असतो त्यावेळी मला कशाची ही चिंता नसते. म्हणूनच आम्ही जास्तीत जास्त एकत्रित घालवीत असतो. ‘
या कार्यक्रमात सोहा कुणाल सोबत आली होती. यावेळी काही जणांनी त्यांना लग्नाविषयी विचारले. सध्या दोघेजणपण करियरवर ध्यान देत आहेत. कुणाल सध्या ‘गो गोवा गोन’ या सिनेमात दिसला. त्याशिवाय त्याचा आगामी काळात ‘भाग जॉनी’ हा सिनेमा येत आहे. तर सोहा सध्या ‘वार छोड़ ना यार’ या सिनेमाच्या शूट मध्ये बीजी आहे.