फ्रेंच ओपनसाठी आज शारापोव्हा – सेरेना झुंजणार

पॅरिस:पॅरिसमध्ये शनिवारी महिला एकेरीच्या जेतेपदासाठीची लढत होईल. यामध्ये रशियाची मारिया शारापोव्हा आणि अमेरिकेची सेरेना विल्यम्स या दोघींमध्ये यंदाची फ्रेंच ओपनच्या जेतेपदाची फायनल रंगणार आहे. सेरेना आणि शारापोव्हामध्ये होणा-या या सामन्यांविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे. ही दोघीतील लढत कोण जिंकणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

गेल्या वेळेसच्या फ्रेंच ओपनमध्ये विजेत्या शारापोव्हाने पहिल्या सेमी फायनलमध्ये व्हिक्टोरिया अझारेन्कावर मात केली होती. शारापोव्हाने हा सामना ६-१, २-६, ६-४ असा जिंकला. तर दुसऱ्या उपांत्य फेरीत सेरेनानं इटलीच्या सारा एरानीचं आव्हान ६-०, ६-१ असे सरळ सेट्समध्ये परतवून लावत विजय मिळवला. त्यामुळे फ्रेंच ओपनच्या जेतेपदाच्या फायनलमध्ये सेरेनाचे पारडे काहीसे जड आहे.

शारापोव्हा आणि सेरेना याआधी १५ वेळा एकमेकींसमोर आल्या आहेत. त्यात सेरेनाने १३ तर शारापोव्हाने केवळ २ वेळाच विजय मिळवला आहे. २००४ नंतर शारापोव्हाने एकदाही सेरेनाला हरवलेले नाही. त्यामुळे शारापोव्हा – सेरेनामध्ये ही लढत कोण जिंकणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

Leave a Comment