इटालियन बहुराष्ट्रीय कंपनी फियाटची उपकंपनी असलेल्या फियाट ग्रूप ऑटो इंडिया प्रा.लिमि. ने त्यांची बहुप्रतिक्षित लिनिया टी जेट सेदान कार १० जूनला भारतीय बाजारात रिलाँच करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. पॉवरफुल इंजिन असलेली, मध्यम आकाराची ही सेदान कार मार्चमध्येच भारतीय बाजारात दाखल होणार होती.
फियाटच्या लिनिया मॉडेलमध्ये कांही सुधारणा करून नवी लिनिया टी जेट बाजारात आणली जात आहे. ही गाडी प्रवासासाठी अधिक आरामदायी असून त्यात जीपीएस, सॅटेलाईट नेव्हीगेशन, स्पोर्टी व्हील्स, अॅटोमॅटिक कलायमेट कंट्रोल आणि स्टायलीश लेदर सीट अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. अर्थात जुन्या लिनियाच्या तुलनेत हिची किंमत थोडी जास्त असेल असे सांगितले जात आहे.
सध्या फियाट ग्रूप इंडियाची दोन मॉडेल्स बाजारात असून पंटो प्रिमियम हचबॅक आणि लिनिया मिडसाईड सलून अशी त्यांची नांवे आहेत. त्यातच आता लिनिया टी जेटची भर पडणार आहे. फियाटची पंटो हचबॅक दिवाळीच्या सुमारास भारतीय बाजारात आणली जाणार आहे.