
जोहान्सबर्ग दि. ८ – दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला यांना पुन्हा त्रास होऊ लागल्याने प्रिटोरिया रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. ९४ वर्षीय मंडेलांची प्रकृती ढासळत चालल्याने शनिवारी पहाटे २ च्या सुमारास रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे प्रेसिडेंट जेकब झुका यांच्या कार्यालयातून जाहीर करण्यात आले आहे.