राज्यातील पहिला पोलिओ रुग्ण आढळला बीडमध्ये

बीड-पोलिओपासून मुक्ती हा सरकारचा दावा पुन्हा एकदा फोल ठरला आहे. देशभरातून पोलिओ मुक्तीसाठी मोठ्या प्रमाणात लसीकरणाची मोहीम राबवली जाते. यासाठी दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च केला जातो. बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील कान्हापूर येथील अकरा महिन्याच्या मुलाला पोलिओ असल्याचे तपासणीत निष्पन झाले आहे. पोलिओचा पी२ नावाचा विषाणू पोझिटिव्ह आला आहे. पोलिओचा देशात सापडलेली ही तिसरी केस असून महाराष्ट्रातील या प्रकारचा पहिला रुग्ण आहे. या घटनेने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय पथक कान्हापूर येथे तळ ठोकून आहे.

बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील कान्हापूर येथील रोहित राजाभाऊ शेळके या अकरा महिन्याच्या मुलाला ताप आला व पाय लुळे पडू लागल्याने सुरुवातीला खाजगी आणि त्यानंतर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले . यावेळी केलेल्या त्याच्या शौचाच्या नमुन्याच्या तपासणीत पोलिओचा विषाणू पोझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी एस. व्ही. वडगावे यांनी दिली. गावातील आणखी काही जणांत पोलिओचे विषाणूची लागण झाली आहे का हे तपासणीसाठी ४३ जणांच्या शौचाचे नमुने आरोग्य विभागाने तपासणीसाठी मुंबईला पाठवले आहेत .

जागतिक आरोग्य संघटनेचे डॉक्टर सतीश सराफ यांच्यासह डॉक्टरांचे पथक बीड जिल्ह्यात ठाण मांडून आहे. दिल्ली जागतिक आरोग्य संघटनेचे डॉक्टर बनपेल हेही बीडमध्ये दाखल होणार आहेत. गावातील आणखी काही जणांत पोलिओच्या विषाणूची लागण झाली आहे का हे जाणून घेण्यासाठी पंचेचाळीस जणांचे शौचाचे नमुने आरोग्य विभागाने मुंबईला पाठवले आहेत. गावातील पाणी नमुनेही तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. या सर्वांचा आवहाल प्राप्त झाल्यानंतर याचे निश्चित कारण समजणार आहे.

Leave a Comment