बँक इमारतीला आग; चौघांचा मृत्यू

मुंबई: अंधेरीतील इंडसन्ड बँकेच्या इमारतीला गुरुवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत, चौघांचा मृत्यू झाला. रात्री ११ च्या सुमारास अचानक लागलेल्या आगीमध्ये इंडसन्ड बँकेच्या चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. या आगी मध्ये दहा जन गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. दरम्यान रात्री उशीरा अग्निशमन दलाच्या १२ गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवून आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये इंडसन्ड बँकेचे संपूर्ण कार्यालय जळाले असून त्यामध्ये मोठे नुकसान झाले आहे.

अंधेरीतील बँकेच्या इमारतीला रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. संपूर्ण इमारतीत धूर झाला, धूर बाहेर जाण्याचा मार्ग नसल्याने बँकेत रात्रपाळीत काम करणारे दहा कर्मचारी बेशुद्ध झाले होते. त्यांना तातडीने उपचारासाठी सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी उपचार सुरु असताना चौघा कर्मचा-यांचा मृत्यू झाला.

या आगीमुळे इंडसन्ड बँकेचे संपूर्ण कार्यालय जळून खाक झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र ही आग शॉर्ट सर्कीटमुळे लागली असावी, असा अंदाज अग्निशमन दलाच्या अधिका-यांनी व्यक्त केला. या आगीमुळे इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे.

Leave a Comment