सॅन फ्रान्सिस्को दि. ७- अमेरिकेतील पोलिसांना सेलफोनच्या होत असलेल्या चोर्या ही मोठीच डोकेदुखी बनली आहे. परिणामी न्यू यॉर्क स्टेट अॅटर्नी जनरल एरिक शिडरमन आणि सॅन फ्रान्सिस्को डिस्ट्रीक्ट अॅटर्नी जॉर्ज गॅस्कॉन यांनी १३ जूनला सेलफोन उद्योगातील चार बड्या उत्पादकांना एका बैठकीस आमंत्रित केले असून त्यात या उत्पादकांना फोन चोरी होताच तो बंद पडेल आणि चोराला त्याचा वापर करता येणार नाही अशी स्पेशल की किवा विशिष्ठ बटन बसविण्यासंबंधी सांगितले जाणार आहे असे समजते.
अमेरिकेत २०१२ या सालात तब्बल १६ लाख सेलफोन चोरीस गेले आहेत. त्यामुळे सेलफोनच्या चोर्या हे अन्य गुन्ह्यांप्रमाणेच राष्ट्रीय संकट बनले आहे. न्यू यॉर्कमधील बैठकीला अॅपल, गुगल स्मार्टची मोटोरोला मोबिलिटी, सॅमसंग आणि मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांना निमंत्रण दिले गेले असल्याचे वृत्त आहे.
गेल्या महिन्यात आयफोनच्या चोर्या करताना चोरट्यांची फोन मालकांचे निर्घृण खून केल्याच्याही घटना घडल्या आहेत. सेलफोनच्या चोर्या रस्त्यातच सर्वाधिक प्रमाणात होत असून त्याबरोबर हिंसाचारही केला जात आहे. या प्रश्नावर उपाय म्हणून मोबाईल कंपन्यांनी हँडसेट उत्पादित करतानाच त्यात किल स्वीचची व्यवस्था करावी अशा सूचना दिल्या जाणार आहेत. यामुळे फोन चोरी झाल्याबरोबर हा स्वीच अॅक्टिव्हेट होईल आणि चोरटा या फोनचा वापरच करू शकणार नाही. सॅन फ्रान्सिस्कोत पडलेल्या दरोड्यापैकी ५० टक्के दरोडे घालताना चोरट्यांची चोरीच्या फोनचा वापर केला असल्याचे आढळले आहेच पण यामुळे मोबाईल मालकांनाही ३० अब्ज डॉलर्सचे नुकसान सोसावे लागले आहे.
अॅपलने त्यांच्या आयफोनसाठी फाईंड माय आयफोन हे अॅप यापूर्वीच बाजारात आणले आहे. त्यामुळे युजर नकाशाचा वापर करून आपला हरविलेला फोन कुठे आहे ते शोधू शकतो तसेच तो लॉक करू शकतो किवा त्यातील डेटा पुसून टाकू शकतो. अमरिकेने सेलफोनसाठी नेशन वाईड डेटाबेस तयार केला आहे पण त्याचा वापर अत्यंत मर्यादित प्रमाणातच होत आहे. कारण चोरलेले फोन बरेचवेळा परदेशात पाठविले जातात किवा ते मॉडिफाईड केले जातात व यामुळे ते चोरीचे आहेत हे ओळखणे अवघड बनते असे पोलिस अधिकार्याचे म्हणणे आहे.