रशिया राष्ट्राध्यक्ष पुतीन आणि पत्नी ल्युडामिन विभक्त

मास्को दि.७ – रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन आणि त्यांची पत्नी ल्युडामिन यांनी ३० वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर विभक्त होत असल्याचा निर्णय सरकारी टिव्हीवरून जाहीर केला आहे. घटस्फोट घेत असल्याची ही घोषणा दोघांनी संयुक्त पणे केली असून परस्परसंमतीने हा घटस्फोट झाल्याचेही जाहीर केले आहे. क्रेमलिन येथील एका कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर पुतीन यांनी ही घोषणा केली.

ल्युडामिन यावेळी म्हणाल्या की आमचे वैवाहिक जीवन संपुष्टात येत आहे कारण प्रत्यक्षात आम्हाला एकमेकांची भेट घेणेही दुरापास्त बनले आहे. पुतीन यांच्या वैयक्तीक आयुष्याबद्दल गेली अनेक वर्षे सातत्याने अफवा उठत आहेत. मात्र रशियन मिडीयाने यासंदर्भात कधीच सार्वजनिक स्वरूपाची चर्चा केलेली नाही. मात्र अनेक राजकीय कार्यक्रमात पुतीन यांच्या पत्नीची अनुपस्थिती जावणत होती.

मास्कोतील एका वर्तमानपत्राने २००८ सालीच पुतीन ऑलिपिक जिमनॅस्ट व सांसद एलिना कबायेवा हिच्याशी विवाहबद्ध होणार असल्याचे बातमी दिली होती. मात्र बातमीचा तातडीने इन्कार करण्यात आला होता आणि कांही काळानंतर या वृत्तपत्राचे प्रकाशनच बंद केले गेले होते असेही समजते.

Leave a Comment