मॅचसाठी जाताना खेळाडूंना मोबाईल सरेंडर करण्याचे आदेश

लंडन दि.६ – आयपीएल स्पॉट फिक्सिंग आणि बांग्ला देश प्रिमियर लिग फिक्सिंग प्रकरणांमुळे क्रिकेटच्या लेाकप्रिय खेळाबाबतच जनमानसाचे मन कलुषित झाले असल्याचे क्रिकेटला पुन्हा पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी आयसीसी सज्ज झाली आहे. यूकेमध्ये आजपासून सुरू होत असलेल्या चॅपियन्स ट्रोफीमध्ये फिक्सिंग आणि भ्रष्टाचाराचे प्रकार घडू नयेत यासाठी आयसीसीने कांही उपाययोजना अमलात आणण्याचे ठरविले आहे.

या सामन्यांत आठ पैकी सहा टीम सहभागी होत आहेत. बांग्ला देश स्पर्धेत नाही. आयसीसीने केलेल्या नियमानुसार आता खेळाडू सामन्यासाठी रवाना होण्यापूर्वीच त्यांना आपापले मोबाईल टीम कोचकडे सूपूर्द करावे लागणार आहेत. त्याचबरोबर आयसीसी भ्रष्टाचार विरोधी व सुरक्षा युनिटचे अधिकारी खेळाडूंच्या वर्तनावर बारीक लक्ष ठेवणार आहेत. खेळाडू हॉटेलमध्ये असताना आणि सामना खेळत असतानाही त्यांच्यावर नजर राहणार आहे. या सुरक्षा युनिट अधिकार्‍यांना खेळाडूंचे आक्षेपार्ह वर्तन, ते देत असलेले धोकादायक संकेत कसे ओळखायचे याचे प्रशिक्षणच दिले गेले असल्याचे सांगितले गेले आहे.

Leave a Comment