च्याम्पियन ट्रोफी – भारताकडे फलन्दाजी तर द. आफ्रिकेकडे गोलन्दाजी

कार्डिफ: इंग्लंडमध्ये आजपासून सुरु होत असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धात सलामीच्या लढतीत भारताचा मुकाबला दक्षिण आफ्रिकेशी आहे. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिन्कुन प्रथम गोलन्दाजि स्वीकारली आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मैदानात भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघ दोन वेळा आमने-सामने उभ्या ठाकल्यायत. त्या दोन्ही लढायांत टीम इंडियानेच बाजी मारली आहे. त्यामुळे या सामन्यात टीम इंडियाचे पारडे जड आहे. सुरुवातीच्या सराव सामण्यात भारताने तीनशे धावाचा टप्पा गाठत श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया या दिग्गज संघाचा पराभव केला आहे. त्यामुळे टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफीचा दावेदार मानले जात आहे.

धोनीच्या टीम इंडियाच्या दृष्टीने चॅम्पियन्स ट्रॉफी सर्वात प्रतिष्ठेची ठरावी. भारतीय संघाने वन डेचा विश्वचषक जिंकल्यानंतर होणारी ही पहिलीच चॅम्पियन्स ट्रॉफी आहे. त्यामुळं चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणं हे टीम इंडियाचे सर्वात मोठे लक्ष्य असेल.विश्वविजेती टीम इंडिया मिनी वर्ल्ड कप जिंकायला सज्ज झाली आहे. श्रीलंका, ऑस्ट्रेलियाविरुद्धचे सराव सामने जिंकून टीम इंडियानं आपले इरादेही स्पष्ट केले आहेत.

चॅम्पियन्स ट्रॉफीचे पहिले दोन्ही सराव सामने भारताने जिंकल्याने टीम इंडियाच्या कॅम्पमध्ये नवा उत्साह संचारला आहे. दिनेश कार्तिकने श्रीलंकेविरुद्ध नाबाद १०६ आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद १४६ धावांची खेळी केली. विराट कोहली आणि कर्णधार धोनीनंही दोन्ही सामन्यांत आपल्या बॅटचा जलवा दाखवला आहे. पण सलामीची जोडी शिखर धवन आणि मुरली विजय सराव सामन्यांत अपयशी ठरली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामन्यात भारतीय गोलंदाजांनी कांगारुंना ६५ धावांमध्येच गारद केलं. उमेश यादवने कांगारुंचा निम्मा संघ गारद केला, तर ईशांतनं तीन विकेट्स काढल्या. पण भारतीय गोलंदाजांची खरी परिक्षा अजून बाकी आहे.

दक्षिण आफ्रिकेला सामोरं जायचं तर टीम इंडियाला डेल स्टेन, मॉर्न मॉर्केलसारख्या वेगवान तोफखान्याला सामोरं जावे लागणार आहे. तर कर्णधार ए.बी. डिव्हिलियर्स, हशिम अमला, जे. पी. ड्युमिनी, ड्यू प्लेसि असे तगडे फलंदाज दक्षिण आफ्रिकेच्या फौजेत आहेत.

Leave a Comment