अभिषेक-असिनची जोडी धूम माजविणार

आगामी काळात पुन्हा एकदा बॉलीवुड अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री असिन यांची जोड़ी सिल्वर स्क्रीनवर धूम माजविणार आहे. ‘ओ माई गॉड’ या सिनेमात अभिषेक आणि असिन यांची जोड़ी झळकणार आहे.

बॉलीवुडमध्ये सध्या चर्चा सुरु आहे की, ‘ओ माई गॉड’ फेम उमेश शुकला एका सिनेमाची निर्मिती करीत आहे. त्या सिनेमासाठी अभिषेक आणि असिनची जोडीला संधी दिली आहे. याबाबत बोलताना उमेश शुकला म्हणाला, या बाबत असिनसोबत बोलणे झाले आहे. या सिनेमाच्या स्क्रिप्टवर सध्या काम सुरु आहे. आता पर्यंत अभिनेत्री साइन केलेली नाही. असिनने होकार दिल्यास तीच या सिनेमाची अभिनेत्री असेल.’

यापूर्वी अभिषेक आणि असिन या जोडीने रोहित शेट्टीच्या ‘बोल बच्चन’ या कॉमेडी सिनामात काम केले होते. बोल बच्चन मध्ये असिनही अजय देवगनच्या अपोजिट सुद्धा होती. हा सिनेमा हिट झाला होता. आगामी काळात येत असलेला उमेश शुकलाचा नवीन सिनेमा सामाजिक आणि कॉमेडी असणार आहे. आगामी काळात लवकरच या सिनामाचे शूट सुरु होणार असल्याचेही शुक्ला यांनी स्प्ष्ट केले.

Leave a Comment