राळेगणमध्ये अण्णांना भेटणार बराक ओबामा

पुणे दि.६ – येत्या आक्टोबरमध्ये भारत भेटीवर येत असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा राळेगण सिद्धीत येऊन ज्येष्ठ समाजसेवक, गांधीवादी अण्णा हजारे यांची भेट घेणार असल्याचे वृत्त आहे. अण्णांच्या दिल्लीतील बेमुदत उपोषण आणि अहिंसावादी मार्गाने चालविल्या गेलेल्या जनआंदोलनाबाबत आणि देशभरातून त्यांना मिळालेल्या प्रचंड पाठिब्याबाबतही ओबामा यांनी विशेष कुतुहल आहे. आणि त्यामुळेच ओबामा अण्णांची भेट घेण्यास उत्सुक आहेत असे सांगितले जात आहे.

वॉशिग्टन डीसी येथील युनायडेड पार्सल सर्वीस (यूपीएस) चे सल्लागार प्रकाश शहा यांनी १ जूनला राळेगण येथे येऊन अण्णांची भेट घेतली होती. त्यांनीच ओबामा अण्णांना भेटण्यास उत्सुक असल्याचे सांगितले. शहा यांनी अण्णांच्या सामाजिक कार्याची सर्व माहिती गोळा करून यूएस अॅथॉरिटीकडे दिली असून अण्णांचे माय व्हीलेज माय पिलग्रिमेज हे पुस्तकही अमेरिकेला जाताता सोबत नेले आहे असे अण्णांचे खासगी सचिव दत्ता आवारी यांनी सांगितले.

प्रकाश शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतात भ्रष्टाचार विरोधात अण्णांनी दिल्लीत केलेले उपोषण, जनलोकपाल बिलासाठी शांतता मार्गाने चालविलेले आंदोलन आणि देशभरातून या आंदोलनाला मिळालेला प्रतिसाद यामुळे ओबामा प्रभावित झाले आहेत. केवळ ओबामाच नव्हे तर सर्व जगाने अण्णांच्या आंदोलनाचे कौतुक केले असून अण्णा आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध होण्यास हे आंदोलनच कारणीभूत ठरले आहे. आक्टोबरमध्ये ते भारतभेटीवर येणार आहेत, तेव्हा अण्णांना राळेगणमध्येच भेटण्याची त्यांची इच्छा आहे. कारण त्यामुळे राळेगणमध्ये अण्णांनी उभे केलले काम ते पाहू शकणार आहेत.

यूएस अॅथॉरिटीने अजून या भेटीबाबत कांहीच स्पष्ट केलेले नसले तरी ओबामा यांनी युनायटेड जनरल असेंब्लीत भाषण करतानाही अण्णांचे नांव न घेता जगभरातील नागरिक शांतता, सहकार्य, स्वाभिमान आणि स्वातंत्र्यासह जगू इच्छीत आहेत असा उल्लेख केला होता आणि तेव्हाच दिल्ली ते वार्सा आणि सेलाला ते साऊथ आफ्रिकेपर्यंत ज्या अहिंसावादी चळवळी चालविल्या जात आहेत त्याचा उल्लेख केला होता.

Leave a Comment