सुरेल ‘माय’चे प्रकाशन!

आईबद्दलची भावना व्यक्त करणारा ‘युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप’ आणि ‘सई प्रकाशन’ची निर्मिती असलेला ‘माय’ नावाचा म्युझिक अल्बम नुकताच प्रकाशित करण्यात आला. अल्बमच्या या प्रकाशन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विजया वाड, सयाजी शिंदे, रामदास फुटाणे, रामदास आठवले, उर्मिला धनगर, अरुण म्हात्रे, प्रकाश होळकर, ‘युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप’चे मंदार गुप्ते, राजन प्रभू आदी उपस्थित होते. वर्षा प्रशांत मोरे यांची प्रस्तुती असलेल्या ‘माय’मधल्या रचना आपल्याला उर्मिला धनगर आणि प्रशांत मोरे यांच्या आवाजात ऐकायला मिळतात. मानसी गुप्ते, पल्लवी बापट, दत्ता मेस्त्री आणि मयुरेश मडगावकर हे सहगायकांनी स्वरसंगत केली आहे. त्याच्याचबरोबर मयूर खांडगे आणि ा मिलींद शिंदे यांनी केलेले अर्थपूर्ण काव्यवाचनाचे सादरीकरणही यात आहे.

Leave a Comment