रिक्षा संघटनेचा १८ जूनपासून बेमुदत संप

मुंबई – तीनचाकी रिक्षाऐवजी क्वाड्रिसायकल (चारचाकी गाडी) , सहाआसनी टॅक्सींना विरोध , रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ देण्यात यावी , रिक्षा-टॅक्सी मोडीत काढण्याची वयोमर्यादा वाढवणे अशा अनेक मागण्यांसाठी संघटनेने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. या मागण्या मान्य न झाल्यास राज्यातील १५ लाख रिक्षाचालक १८ जूनपासून राज्यव्यापी बेमुदत संपावर जातील , असा इशारा युनियनचे अध्यक्ष शरद राव यांनी दिला आहे.

‘ मुंबई ऑटोरिक्षामेन्स युनियन ‘ ने आपल्या मागण्यांसाठी १८ जूनपासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. सहाआसनी टॅक्सी, चारचाकी क्वाड्रिसायकल, आरक्षण धोरण, जुन्या रिक्षा-टॅक्सी मोडीत काढण्यापासून प्रवाशांना सुविधा मिळणा-या सर्वच धोरणांना रिक्षा संघटनेने विरोध दर्शवत राज्यव्यापी बेमुदत संपाचा इशारा दिला आहे.

रिक्षा-टॅक्सींमध्ये आणखी खासगी गाड्या आणणे चुकीचे असल्याचे युनियनचे म्हणणे आहे. सहाआसनी , चारचाकी वाहनांमुळे नुकसान होणार असल्याने त्यास विरोध असल्याचे राव यांनी मंगळवारी स्पष्ट केले. बेमुदत संपापूर्वी १२ जून रोजी रिक्षाचालक-मालक वीर जिजामाता भोसले उद्यान ते मंत्रालयापर्यंत मोर्चा काढणार आहेत. या मोर्चात रिक्षाचालक-मालकानी सहभागी व्हावे असे आव्हान ‘ मुंबई ऑटोरिक्षामेन्स युनियन ‘ ने केले आहे.

Leave a Comment