नवी दिल्ली- आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ता परिवर्तन अत्यावश्यक आहे. काँग्रेसची सत्ता उलथवून टाकण्याची ताकद केवळ गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींमध्ये आहे. त्यांची काम करण्याची घेण्याची पद्धत उत्कृष्ट आहे, ज्याचे उत्तम उदाहरण गुजरात राज्याचा होत असलेला विकास आहे. त्यामुळे मोदींनाच पंतप्रधान पदाचे उमेदावर बनवावे यासाठी मी वकिली करण्यास तयार आहे, असे बाबा रामदेव यांनी स्पष्ट केले.
नवी दिल्ली येथे घेण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये मोदींच्या नावावरून अजून तळ्यात-मळ्यात अशी स्थिती आहे. पंतप्रधान पदासाठी भाजपचा उमेदवार मोदी होणार की नाही यावर एनडीएमध्येही मतभेद आहेत. पण हे मतभेद कमी करण्यासाठी आत योगगुरू बाबा रामदेव हे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची वकिली करणार आहेत.
गोध्रा हत्याकांडनंतर उसळलेल्या गुजरात दंगलीसाठी जर मोदींना दोषी मानण्यात येत असेल तर भारत-पाक फाळणीच्यावेळी झालेल्या दंगलीत १० लाख मृत्यूस कारण नेहरुंना मानणार का, असा प्रश्न बाबा रामदेव यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. आपण मोदींची प्रतिमा स्वच्छ आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. आगमी काळात बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनाही मोदी हेच या पदासाठी कसे योग्य आहे हे मी नक्की पटवून देईन, असा विश्वासही त्यानी यावेळी व्यक्त केला.