स्वस्त आयफोनचे फोटो झाले लिक

नवी दिल्ली दि.४ – अॅपलच्य आयफोन सिरीजमधील दोन नवे फोन त्यांच्या वार्षिक परिषदेत लाँच केले जाणार असल्याची चर्चा जोरावर असून त्यात आयफोनचे स्वस्त व्हर्जनही सादर केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. या स्वस्त हँडसेटबाबत गुप्तता पाळली जात असली तरी चीनी युजरनी वाईबो या मायक्रो ब्लॉगिगवर या फोनची प्रतिमा लोड केली आहे.

त्यात दिलेल्या माहितीनुसार हा स्वस्त आयफोन मागच्या बाजूने थोडा बाकदार आहे व त्यामुळे तो हातात धरताना अतिशय सोयीचा वाटतो आहे. यापूर्वी अॅपलने नेव्ंही, गोल्ड ऑरेंज, पांढरा, गुलाबी आणि हिरवा या रंगात स्वस्त आयफोन सादर करण्याचा विचार केला होता. या फोनची १ हजार मॉडेल्स तयार करण्यात आली असून त्याच्या चाचण्याही जूनमध्ये सुरू झाल्या आहेत. या फोनचे केसिंग प्लॅस्टीक पॉलीकार्बोनेट पासून बनविले गेले असल्याचीही चर्चा आहे. हा फोन ३०० ते ४०० डॉलर्सच्या रेंजमध्ये विकला जाईल असेही सांगितले जात आहे.

परिषदेत २० जून रोजी हा स्वस्त आयफोन आणि आयफोन पाच -एस अशी दोन नवी मॉडेल सादर केली जाणार असल्याचीही चर्चा आहे.