रुपेरी पडदा व्यापण्यासाठी पूनम सज्ज

आपली वादग्रस्त वक्तव्ये आणि भलत्याच उद्योगांमुळे सतत चर्चेत राहणारी बिनधास्त बाला लवकरच रुपेरी पडदा काबीज करण्यास येत आहे. बॉलीवूडमधील
तिचा पहिलाच चित्रपट ‘नशा’च्या प्रदर्शनाची तारीख नक्की झाली आहे. पूनमचा हा चित्रपट हिंदी सिनेसृष्टीतील आतापर्यंतचा सर्वात बोल्ड चित्रपट म्हणून जाहीर करण्यात आला आहे. पूनमची प्रमुख भूमिका असलेला ‘नशा’च्या प्रदर्शनाचा मुहूर्त निश्‍चित करण्यात आला असून येत्या २६ जुलैला मल्टिप्लेक्ससोबतच एकेरी पडदा चित्रपटगृहांमध्ये तो झळकविला जाणार आहे.

तत्पूर्वी चालू आठवड्यामध्ये या चित्रपटाचा पहिला ट्रेलर कधीही लॉँच केला जाण्याची शक्यता आहे. ‘नशा’चा दिग्दर्शक अमित सक्सेना यानेच ही माहिती दिली आहे. त्याचा फस्र्ट लूक नुकताच जारी करण्यात आला असून त्यामध्ये पूनम अतिशय सुंदर आणि हॉट दिसली आहे. म्हणूनच आपल्या या चित्रपटाची ती आतुरतेने वाट पाहत आहे.

या चित्रपटाच्या निर्मितीचे काम आटोपले असून तो जवळपास बनून तयार आहे. आता फक्त पोस्ट प्रॉडक्शनचे काम शिल्लक आहे व तेही लवकरच हातावेगळे केले
जाईल, असे अमितने सांगितले. पूनमचा हा चित्रपट घोषणा झाल्यापासूनच चर्चेत आहे. या चित्रपटाची कल्पना अतिशय बोल्ड असून त्यात १८ वर्षांचा तरुण व २५
वर्षीय तरुणी यांच्या प्रेमाची कथा दाखविली आहे. ती अतिशय वेगळ्य़ा ढंगात दाखविण्यात आली आहे. या चित्रपटात भडक दृश्यांचा भडिमार असल्याचेही सांगितले जाते. ‘नशा’च्या आधी अमित सक्सेनाने जॉन अब्राहम आणि बिपाशा बासू या बॉलीवूडमधील पूर्वाश्रमीच्या हॉट जोडीला घेऊन ‘जिस्म’ चित्रपट केला होता. ईगल होम एंटरटेन्मेंटच्या बॅनरखाली बनत असलेल्या ‘नशा’ची सुरिंदर सुनेजा व आदित्या भाटिया यांनी निर्मिती केली आहे.

Leave a Comment