राजकीय थरर पटा ‘पावर’

दमदार आणि तगडया कलावंतांच्या अभिनयाच्या जुगलबंदीत साकारलेला एक राजकीय, सामाजिक आणि महिलाप्रधान मराठी चित्रपट पावर (सामान्यांची असामान्य पावर) 7 जून पासून संपुर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे, डीआर 2 फिल्म्स या निर्मिती संस्थेअंतर्गत या मराठी चित्रपटाची निर्मिती धनजी पटेल, दिनेश चौधरी आणि नीता भारती यांची असून, कथा – पटकथा आणि संवाद राजू मेश्राम तर चित्रपटाचे दिग्दर्शक विजय राणे आहेत.

नागेश भोसले आपल्या भूमिकेविषयी सांगतात की, चित्रपटात मी एका प्रस्थापित राजकीय पुढार्‍याची भूमिका साकारतो आहे, धृपतरावचा राजकीय वर्तुळात चांगला दबदबा आहे, शिवाय या वेळेस त्यांच्या जिल्हयाला मंत्रीपद मिळणार असून त्यासाठी त्यांचा संघर्ष सुरु आहे, परंतू या सर्व घटनाक्रमांमध्ये अचानक त्यांना गौरी नावाची एक महिला भेटते, मग त्यांच्यात काही घटना घडतात आणि इथेच चित्रपटाचे कथानक वळण घेते. पावरचे संगीत आदर्श शिंदे, उत्कर्ष शिंदे यांचे आहे. पावर 7 जुन रोजी प्रदर्शित होत आहे.

Leave a Comment