मुंबई – बॉलिवूडमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारी अभिनेत्री जिया खान हिने सोमवारी मध्यरात्री घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. तिने आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसाकडून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.

जियाच्या आत्महत्येचं नेमकं कारण शोधण्याचं आव्हान पोलिसांपुढे आहे. जियाचे शेजारी आणि वॉचमनची चौकशी करून, ती सगळ्यात शेवटी कुणाला भेटली होती, हे ते आधी जाणून घेणार आहेत. त्यानंतर त्या व्यक्तीची चौकशी केली जाईल, अशी माहिती पोलिससूत्राकडून समजते.
अभिनेत्री जिया वैयक्तिक कारणांमुळे गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली वावरताना दिसत होती. लवकरच सिनेमामध्ये परतण्याच्या दृष्टीनं तिचे प्रयत्न सुरू होते. काही निर्माता – दिग्दर्शकांनाही ती भेटत होती, अशी माहिती तिच्या निकटवर्तियांनी दिली. मात्र तिने अचानक आत्महत्या का केली याचे कारण मात्र गुलदस्त्यच आहे.जियाच्या आत्महत्येनं बॉलिवूडला जबरदस्त हादरा बसला आहे. सोशल नेटवर्किंग साइटवरून अनेक बॉलिवूडकरांनी तिला श्रद्धांजली वाहिली आहे.
लंडनमध्ये जन्मलेली आणि तिथेच लहानाची मोठी झालेली जिया काही वर्षांपूर्वीच आपल्या आईसोबत, रबिया अमिन यांच्यासोबत भारतात आली होती. तिचं मूळ नाव नफिसा खान असे होते. तिचा निःशब्द ‘ हा चित्रपट काहीसा वादग्रस्त ठरला होता. या सिनेमासाठी तिला ‘ फिल्मफेअर ‘ चे नामांकनही मिळाले होते.