नवी दिल्ली: अन्न सुरक्षा विधेयकासाठी केंद्र सरकार आज अध्यादेश काढण्याची शक्यता आहे. केंद्रीय कॅबिनेटची बैठक मंगळवारी होणार आहे. या बैठकित अन्न सुरक्षा विधेयकावर चर्चा होणार असून त्यानंतर त्यावर अध्यादेश काढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अन्न सुरक्षा विधेयकाचा अध्यादेश काढण्यापूर्वी केंद्र सरकार विशेष अधिवेशनासाठी इतर पक्षांशी चर्चा करणार आहे. त्यामध्ये सहमती झाली नाही, तर अन्न सुरक्षा विधेयक मंजूर करण्यासाठी अध्यादेश काढला जाण्याची शक्यता असल्याची माहिती सरकारी सुत्राने दिली आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या आधी विशेष अधिवेशनाची मागणी विरोधी पक्ष असलेल्या भाजपने केली आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार भाजप या विधेयकाच्या विरोधात नाही. पण त्यामध्ये काही बदल करण्याची मागणी भाजप करत आहे. त्यामुळेच त्यांनी सरकारकडे या बाबत विशेष अधिवेशनाची मागणी केली आहे. त्यामुळे आज होणा-या केंद्रीय कॅबिनेटची बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या विधयकाला काही जणाचा विरोध असल्याचे समजते.