मोटर स्पोर्ट्सबाबत वाढती आवड

पुणे दि. 4 : क्रिकेट देशात सर्वाधिक लोकप्रिय असले तरी मोटर स्पोर्ट्सबाबत हळुहळू आवड निर्माण होत असून नवनवे उत्पादक आणि पुरस्कर्ते याकडे वळत आहेत यात अजूनही वाढ होण्याची गरज आहे. त्यातून भारतातील ज्या तरुणांना या क्षेत्राकडे यायचे आहे त्यांना संधी मिळेल असे फोकसवागन मोटार स्पोर्ट विभागाचे प्रमुख पृथ्वीराज सिद्धप्पा यांनी आज येथे पत्रकारांना सांगितले

इंडियन नॅशनल रॅली चॅम्पियनशीपचा महाराष्ट्रातील दुसरा टप्पा यंदा नाशिकमध्ये होणार असून त्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेवेळी त्यांनी ही माहिती दिली. सिद्धप्पा पुढे म्हणाले की आमच्या कंपनीने त्यासाठी वेगळी कस्टमर स्पोर्ट्स डिव्हिजन सुरु केली आहे . त्यामार्फत देशातील उदयोन्मुख रेसिंग आणि रॅली स्पर्धकांना निवडणे आणि त्यांना प्रशिक्षित करणे हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. स्लाईड वेज इंडस्ट्रीला नाशिकच्या स्पर्धेसाठी दिलेला पाठींबा हे त्याचेच उदाहरण आहे मुंबई , पुणे आणि नाशिक मध्ये या क्रीडा प्रकाराचे अधिक चाहते निर्माण होत असून सध्या टोयोटा, महिंद्र आणि फोकस वागन , जेके टायर अशा कंपन्या स्पर्धेला आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य करत आहेत ही संख्या आगामी काळात वाढेल अशी अपेक्षा आहे

स्लाईड वेज इंडस्ट्रीने पुण्याजवळ चाकण येथे रेसिंग कार साठी खास ट्रॅक त्या केला असून यंदापासून तो चाहते आणि स्पर्धक यांना अधिक चांगल्या सोयी देऊन उपलब्ध केला जाणार आहे अशी माहिती कंपनीचे पदाधिकारी रोहन पवार यांनी दिली. येथे येणार्‍या स्पर्धकांना सवलतीत सुटे भाग आणि तांत्रिक सहाय्य दिले जाणार आहे नाशिकमध्ये येत्या सात ते नऊ जून या काळात रॅली होत असून तीत स्लाईड वेजचे पाच स्पर्धक पाच फोकसवागन कार सह सहभागी होत आहेत असेही त्यांनी सांगितले

Leave a Comment