मनाली म्हणून दाखवलं काश्मिर

सुंदर निसर्ग, दूरच दूर पसरलेला बर्फ अशा प्रसन्न निसर्ग दृश्यांमुळे सध्या ‘ये जवानी हे दिवानी’ हा चित्रपट चांगलाच गाजतोय. पण मनाली म्हणून दाखविण्यात आलेली ही नयनरम्य ठीकाणं मुळात मनालीची नसून जम्मु काश्मीरची आहेत. काश्मीरला मनाली म्हणून दाखविल्यांने मुख्यमंत्री ओमर अब्दुलांनी सोशल नेटवर्किंग साईटवरुन नाराजी व्यक्त केली आहे.

काश्मिरमध्ये चित्रित करण्यात आलेल्या निसर्गरम्य स्थळांना मनालीचं नाव देणं अपमानास्पद आहे. तसेच, हा चित्रपट पाहून मनालीलीला जाण्याचा विचार करणाऱ्यांनी ही सर्व दृष्य गुलमर्गमध्ये चित्रित करण्यात आली आहेत हे लक्षात घ्याव असंही त्यांनी म्हटलं आहे.

“मी स्वत: चित्रपटप्रेमी आहे. त्यामुळे ‘ये जवानी हे दिवानी’च्या सर्व कलाकारांसाठी मी गुलमर्ग येथे एका खास मेजवानीच आयोजन देखील केलं होतं.” असंही, त्यांनी सोशल नेटवर्किंग साईटवरुन व्यक्त केलेल्या नाराजीत म्हटलं आहे. चित्रपटाच्या सुरवातीला क्रेडीटमध्ये ओमर अब्दुलांचे नाव देखील देण्यात आलंय.

Leave a Comment