पाँटिंगने केली सचिनच्या विक्रमाची बरोबरी

लंडन – माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटिंगने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये शनिवारी कौंटी चॅम्पियनशिप स्पर्धेत सरे या संघाकडून आपले ८१ वे शतक ठोकले. याचवेळी त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी साधली. पोंटिंग क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये तो अजून खेळत आहे. विशेष म्हणजे भारताचा माजी कर्णधार व लिटल मास्टर सुनील गावसकरच्या नावावरही ८१ शतके आहेत.

डर्बीशायर संघाविरुद्ध १९२ धावांची धडाकेबाज खेळी करणा-या पाँटिंगने हे प्रथमश्रेणीतील ८१ वे शतक ठोकले. या शतकाबरोबरच पाँटिंगने सचिनच्या प्रथमश्रेणी क्रिकेटमधील ८१ शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली. या सामन्याआधी रिकी पाँटिंगने २८७ सामन्यांत ८१ शतकांसह ५५.२७ च्या सरासरीने २३ हजार ८४९ धावा प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये केल्या आहेत.

मास्टर-बाल्स्टार सचिनच्या नावावर ३०७ सामन्यांत ८१ शतकांसह २५ हजार २२८ धावा आहेत. विशेष म्हणजे भारताचा माजी कर्णधार व लिटल मास्टर सुनील गावसकरच्या नावावरही ८१ शतके आहेत.
त्याच्या विक्रमाची ही रिकी पाँटिंगने बरोबरी केली आहे. आता आगामी काळात सचिन व सुनिल गावस्करचा हा विक्रम पाँटिंग मोडणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment