दालमियांचा चीअर लीडर्सला विरोध

नवी दिल्ली, दि.3 – आयपीएलची विश्वासहर्ता पुन्हा निर्माण करण्यासाठी बीसीसीआयचे नवनियुक्त हंगामी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी आयपीएलची स्वच्छता हाती घेण्याचे संकेत दिले आहेत. दालमिया यांनी आयपीएलमधील चीअर लीडर्स आणि स्ट्रॅटजिक टाईम आऊटच्या पद्धतीला विरोध केला आहे.

माझ्यावर जबाबदारी सोपवली असून, मी ती टाळू शकत नाही असे दालमिया यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्याच पत्रकारपरिषदेत सांगितले. आयपीएलमध्ये खेळणारे खेळाडू बेकायदा कृत्यात सहभागी असतील, तर त्यासाठी संघमालकांना जबाबदार धरले जाईल असे दालमिया यांनी स्पष्ट केले.

आयपीएलला अधिक स्वच्छ आणि पारदर्शक बनवण्यासाठी सामन्यानंतर होणा-या पार्ट्यांवर बंदी एक पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. बीसीसीआयचे माजी सचिव संजय जगदाळे राजीनामा मागे घेण्यास तयार नसल्याचे त्यांनी सांगितले. बीसीसीआयचे माजी कोषाध्यक्ष अजय शिर्के यांच्या प्रतिसादाची आम्ही वाट पहात आहोत असे दालमिया म्हणाले.

Leave a Comment