तरूणाई नोमोफोबियाने त्रस्त

मेलबर्न दि.३ – नोमोफोबिया हा काय नवा प्रकार असा विचार तुमच्या मनात आला असेलच. फोबिया म्हणजे भीती हे सर्वांना माहिती असते. हायड्रोफोबिया म्हणजे पाण्याची भीती. तसेच नोमोफोबिया म्हणजे नो मोबाईलची भीती.

ऑस्ट्रेलियातील सिस्कोतर्फे या संबंधात नुकतेच एक सर्वेक्षण करण्यात आले. त्यात असे आढळले की तीस वर्षांखालील तरूणांत १० तरूणांत ९ जण नोमोफोबियाने त्रस्त आहेत. सिस्कोचे या सर्वेक्षणातले प्रमुख तंत्र अधिकारी केव्हीन बॉल्श या संदर्भात अधिक माहिती देताना म्हणाले की तरूणांमध्ये हा विकार येतोय त्याची जाणीव मात्र त्यांना नाही. हे नकळतच घडते आहे. बंदी असूनही २० टक्के तरूण ड्रायव्हिंग करत असतानाही एसएमएस करतात.

तीस वर्षांखालील तरूणांना स्मार्टफोनचे जणू व्यसन लागले आहे किंवा त्याची चटक लागली आहे. त्यामुळे फोन हरविला की ते सैरभैर होतात. आपला फोन हरवणार तर नाही ना ही शंका त्यांना सतत येत राहते. स्मार्टफोन हा जणू त्यांच्या शरीराचाच एक भाग बनला आहे. उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यांना फोन सतत जवळ लागतो. सर्वेक्षणात असेही आढळले आहे की ही पिढी दर दहा मिनिटांनी मेल चेक करणे, मेल करणे अथवा सोशल मिडीयासाठी फोन वापरतातच.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment