आयपीएल बेटींग- बुकींनाच ५ हजार कोटींचे नुकसान

मुंबई दि.३ – आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणाचा भांडाफोड होऊन पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतल्यानंतर बुकींनाच ५ हजार कोटी रूपयांचे नुकसान सोसावे लागत असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. त्यात प्रामुख्याने मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे येथील बुकींचा समावेश आहे. मॅचेस अगोदरच फिक्स केल्याचे कारण देऊन पंटरनी या बुकींना पैसे देण्याचेच नाकारल्याने बुकींवर नुकसानीची पाळी आली असल्याचेही सांगण्यात येत आहे.

यात अनेक नामवंत पंटरचा समावेश आहेच पण मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार यात किमान २०० महिला सहभागी आहेत. त्यात बॉलीवूड कलाकाराच्या आईचाही समावेश असून तिने सात कोटी रूपयांचा सट्टा लावला होता आणि आता हे पैसे देण्यास नकार दिला आहे. बेटींग घेऊन नंतर मॅच फिक्स केल्या गेल्या ही आमची फसवणूक असल्याचे अनेक पंटरचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे बुकी पैसे गोळा करायला गेले तर त्यांना नकार तर मिळतोच आहे पण अगदी त्यांनी अंडरवर्ल्डला कळवायची भीती घातली तर पंटरही पोलिसांना सांगण्याची धमकी देत आहेत.

पोलिसांनी घातलेल्या छाप्यांमुळे आणि अजूनही छापासत्र सुरूच असल्याने अनेक बुकी भूमिगत झाले आहेत. फोन करून ते बेटर्सला सट्टा म्हणून लावलेले पैसे देण्याचा तगादा करत आहेत मात्र हे पैसे वसूल करणे त्यांना अशक्य बनले आहे. बेटींग लावणार्यांआमध्ये बॉलिवूड कलाकारांबरोबरच उल्हासनगरचे नगरसेवक, तसचे सेनेच्या नगरसेविका यांचाही समावेश असून त्यांना मोठ्या रकमांचा सट्टा लावला होता असेही समजते.

Leave a Comment