सानिया-बेथानी दुसर्‍या फेरीत

पॅरिस- फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत चौथा मानांकित डेव्हिड फेरर, स्पेनचा राफेल नदाल आणि अव्वल मानांकित सेरेना विल्यम्स, सानिया मिर्झाने आगेकूच सुरु ठेवली आहे. भारताची खेळाडू सानिया मिर्झा व बेथानी माटेक-सँडने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीत धडक मारली आहे. सानियाच्या खेळीमुळे भारतीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत या सातव्या मानांकित जोडीने महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीत अलिझे कार्नट व विरगिनिई राझ्झानोचा पराभव केला. सानिया-बेथानीने अवघ्या ८२ मिनिटांमध्ये लढतीत ६-३ , ६-४ अशा फरकाने विजय मिळवला. या इंडो-अमेरिकन जोडीचा दुसर्‍या फेरीत अमेरिकेच्या लायुरेन डेव्हिस व मेगान मोयल्टनसोबत सामना होईल.फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत फेरर व सेरेनाने स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले. दुसरीकडे नोवाक योकोविकने चौथ्या फेरीत धडक मारली. राफेल नदालने तिसर्‍या फेरीत इटलीच्या फेबियो फोगनिनीवर मात केली. त्याने 7-6, 6-4, 6-4 ने सामना जिंकून चौथी फेरी गाठली.

फेररने दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसनवर एकतर्फी विजय मिळवला. त्याने लढतीत 6-3, 6-1, 6-1 अशा फरकाने विजय मिळवला. कोणताही सेट न गमावता त्याने अंतिम 16 मध्ये प्रवेश केला. सर्वाधिक वेगवान सर्व्हिस करणार्‍या अँडरसनचा या सामन्यात फार काळ निभाव लागला नाही.

स्वेतलाना कुज्नेत्सोवाने तीन सेटमध्ये शानदार विजय मिळवला. तिने आठव्या मानांकित एंजेलिक केर्बरचा पराभव केला. तिने रोमांचक लढतीत 6-4, 4-6, 6-3 ने बाजी मारली. तिने दोन तास 21 मिनिटांत रंगलेल्या रोमांचक लढतीत शानदार विजय मिळवला.फ्रांन्सच्या ज्यो विल्फ्रेंड त्सोंगाने पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीत धडक मारली. त्याने तिसर्‍या फेरीत सर्बियाच्या व्हिक्टर ट्रोइस्कीचा पराभव केला.

Leave a Comment