भारतात बुलेट ट्रेन प्रत्यक्षात धावणार

टोकियो, दि.३ – अत्यंत प्रगत व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अविष्कार समजल्या जाणारया बुलेट ट्रेनसाठी भारताला जपानने मदत करण्याचे ठरविले आहे. जपान दौरयावेळी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व जपानचे पंतप्रधान शिंझो अॅणबे यांच्यात बुधवारी चर्चा झाली होती. यानंतर बुलेट ट्रेनचे तंत्रज्ञान भारताला देण्याबाबत जपानने आग्रहाची भूमिका घेतली.

तंत्रज्ञानाबरोबरच या प्रकल्पासाठी १०१.७ अब्ज येन (एक अब्ज डॉलर्स) जपानने भारताला मदत म्हणून देण्याचे ठरवले आहे. भारतीय रेल्वे आता या घडीला तासाला जास्तीत जास्त १०० ते १५० किलोमीटर धावत आहेत. मात्र तासाला ३०० ते ४०० किलोमीटर वेगाने धावणारया बुलेट ट्रेनची गरज भासू लागली आहे..

बुलेट ट्रेन मुळे मुंबई ते अहमदाबाद हे ५०० किलोमीटरचे अंतर अवघ्या तासाभरात कापता येणार आहे. मार्च २०१४ पर्यंत दोन्ही देश तांत्रिक गोष्टींचा विचार करून पुढचे पाऊल उचलणार आहेत. यानंतरच बुलेट ट्रेन उभारणीस सुरवात केली जाईल असे समजते.