धोनीचे दुट्टपीपण

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी क्रिकेट आणि बिझनेस गेम सध्या एकत्र खेळतांना दिसत आहे. सर्वेनुसार रिती स्पोर्टस् मॅनेजमेंट कंपनीमध्ये धोनीची 15 टक्के भागीदारी आहे. ही कंपनी क्रिकेटपटूंच्या प्रोफेशनला लाईफला मॅनेज करते. त्याचबरोबर टीम इंडियाचे सुरेश रैना, रवींद्र जाडेजा आणि प्रग्यान ओझा यांचं प्रोफेशनल लाईफ हीच कंपनी मॅनेज करते. हे चारही क्रिकेटपटू धोनीचे जवळचे मित्र आहेत. त्यामुळे टीम सिलेक्शनच्या वेळी धोनी आपलं मत देतो, त्यावेळी या क्रिकेटपटूंचा विचार तो निश्चित करत असणार अशी शंका उपस्थित केली जातेय. त्यातच धोनी टीम इंडियाच्या तिन्ही फॉरमॅटचा कॅप्टन आहे. त्यामुळे केवळ मर्जीतल्या क्रिकेटपटूंना धोनी संधी देतो का, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. एकूणच धोनीच्या रिती कंपनीत असलेल्या भागीदारीमुळे अनेक शंका-कुशंका व्यक्त केल्या जातायत.

महेंद्रसिंग धोनी हा कंपनीचा भागधारक नाही- रिती स्पोर्ट्स

रिती स्पोर्ट्स ही कंपनी धोनीचा निकटचा मित्र अरुण पांडेच्या मालकीची असून त्यात धोनीचे 15 टक्के शेअर्स असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. परंतु रिती स्पोर्ट्सचे अध्यक्ष अरुण पांडे यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे.

काही जुने हिशेब चुकते करण्यासाठी धोनीला 22-3-2013 रोजी काही समभाग देण्यात आले होते. परंतु ही देणी एप्रिलमध्ये चुकती करण्यात आल्यानंतर 26-4-2013 रोजी हे समभाग परत घेण्यात आले. त्यामुळे धोनी सध्या आमच्या कंपनीचा भागधारक नाही, असा खुलासा पांडे यांनी केला आहे. तसेच विपर्यस्त वृत्तामुळे आम्ही दुखावले गेलो आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे.

रिती स्पोर्ट्सनेच धोनीला तीन वर्षांसाठी 210 कोटी रुपये मोजून करारबद्ध केले होते, तेव्हा भारतीय क्रिकेटविश्‍वातील हा सर्वाधिक रकमेचा करार ठरला होता. मात्र त्यानंतरच भारतीय संघातील, तसेच चेन्नई सुपर किंग्ज संघातील आणखी काही क्रिकेटपटूंनाही र्‍हिती स्पोर्ट्सनेे करारबद्ध केले होते.

Leave a Comment