प्राचीन इजिप्शियन संस्कृतीत उल्कांपासून बनत होते दागिने

इजिप्त संस्कृती अतिप्राचीन संस्कृती म्हणून जगाला माहिती आहे. या संस्कृतीत मृतांबरोबरच त्यांची आठवण म्हणून कांही वैशिष्टपूर्ण दागिने मृतदेहाबरोबर पुरण्याची प्रथा आहे. सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीच्या कबरस्थानात अशाच कही दागिन्यांचे नमुने मिळाले असून हे दागिने उल्कापातापासून बनविले गेल्याचे वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनात सिद्ध झाले आहे. कैरो शहरापासून ७० किमी दूर असलेल्या स्मशानभूमीत मिळालेले हे दागिने ३३५० ते ३६०० बीसी पूर्व काळातील आहेत. विशेष म्हणजे इजिप्शियन लोकांना लोखंड या धातूचा शोध लागण्या अगोदरच हजारेा वर्षे लोखंडाच्या मण्यांपासून हे दागिने बनविले गेले आहेत. अर्थात हे लोखंड निकेल धातूने समृद्ध असल्याने या दागिन्यांची चमक आजही कायम आहे.

या दागिन्यांच्या तपासण्या इलेक्ट्रोनिक मायक्रोस्कोपखाली केल्या गेल्या तसेच त्यांचे एकस रे आणि स्कॅनिगही केले गेले तेव्हा हा धातू पृथ्वीवर अंतराळातून येणार्या उल्कांपासूनच मिळाल्याचे पुरावे मिळाले आहेत. प्राचीन इजिप्शियनना अंतराळातून पडलेला हा धातू नककीच जादूई आणि कांही धार्मिक शक्ती असलेला वाटत असणार असा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळेच या धातूपासून त्यांनी अतिशय सुंदर आणि दुर्मिळ अशा वस्तू , दागिने बनविले असले पाहिजेत आणि या वस्तूंना धार्मिक महत्त्वही दिले असले पाहिजे असे संशोधकांना वाटते.

उल्का पृथ्वीवर येताना प्रचंड वेगाने अंतराळातून येतात आणि त्या पृथ्वीवर आदळल्यानंतर थंड होण्यासाठी त्यांना बराच काळ लागतो. यामुळे त्यांचे स्ट्रक्चर एकमेवाद्वितीय बनते असाही शास्त्रज्ञांना दावा आहे.

Leave a Comment