एनडीए चा 124वा दिक्षांत समारोह -जे. एस.सुमन राष्ट्रपती पदकाचा मानकरी.

पुणे दि. 31 (प्रतिनिधी) तीन वर्षांच्या खडतर परिश्रमानंतर येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील नौदल विभागाच्या सैनिकी स्नातकांनी परेड, प्रात्यक्षिके व टोप्या हवेत भिरकावून आपला दीक्षांत समारोह साजरा केला.अतिशय व्यवस्थित परेड, सुपर डिनोमा विमानांचे फ्लाय पास्ट, सुखोई आणि सारंग विमानांची चित्तथरारक प्रात्यक्षिके, अशा वातावरणात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा 124 व्या तुकडीचा दिक्षांत समारोह संपन्न झाला. खडकवासल्याच्या प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांनी आज अरुण खेत्रपाल परेड ग्राउंडवर दिक्षांत संचलन केले. नौदलाचे प्रमुख अ‍ॅडमिरल डी. के. जोशी यांनी संचलनाची पाहणी केल्या नंतर मानवंदना स्विकारली. यावेळी दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अशोक सिंग, एनडीएचे प्रमुख कमांडंट एयर मार्शल के. पी. गिल उपप्रमुख रिअर अ‍ॅडमिरल आनंद अय्यर, प्राचार्य ओ. पी. शु्नला आदी मान्यवर उपस्थित होते.

जे. एस.सुमन याने शास्त्र व संगणकशास्त्र विषयात गुणवत्तेने प्रथम श्रेणीत पदवी मिळवली. त्याला अ‍ॅडमिरल डी. के. जोशी यांच्या हस्ते राष्ट्रपतींचे सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. त्याचबरोबर विक्रांत कुमार याला रौप्य, तर विशाल दहिया याला कांस्य पदक प्रदान करण्यात आले. ‘एन’ स्वार्डनला सर्वोत्कृष्ठ स्वार्डन म्हणुन ‘चीफ ऑफ स्टाफ ऑफ बॅनर’ ने गौरवण्यात आले. अ‍ॅडमिरल डी. के जोशी यावेळी म्हणाले, कोणत्याही संकटाबरोबर सामना करण्याची जिद्द येथे मुलांना शिकवली जाते. धडाडीचे नैत्रुत्नगुण आणि प्रतिकुल परिस्थितीमध्ये कसे जगावे हे या प्रशिक्षणात शिकवले जाते. त्यामुळे येथून बाहेर पडणारा विद्यार्थी हा सर्वच दृष्टीकोनातून सक्षम झालेला असतो. एनडीए मध्ये असणार्‍या परदेशी विद्यार्थ्यांसाठी जोशी म्हणाले, आम्हाला तुमच्या आणि तुमच्या देशाचा अभिमान आहे. येथून गेल्यानंतर तुमच्या वर तुमच्या देशाला देखील अभिमान असणार आहे.

संचलनानंतर ‘एनडीए’ तील विद्यार्थ्यांनी आपल्या टोप्या हवेत भिरकावत आपला आनंद व्यक्त केला. यात विद्यार्थ्यांनी आपल्या मित्रांना देखील सहबागी करुन घेतले. यावेळी ‘सुखोइर्’ आणि ‘सारंग’ यांच्या आकाशातील झेपावणे पाहून आलेल्या पालकांचे चित्त हरवले.

Leave a Comment