नवी दिल्ली दि. ३० – सोनी इंडियाने त्यांच्या एक्सिपिरीया श्रेणीचा विस्तार करताना एक्सपिरीया जेड टॅब्लेट भारतात सादर केला आहे. जगातील हा सर्वात स्लीम टॅब्लेट असल्याचा कंपनीचा दावा असून या टॅब्लेटची जाडी आहे ६.९ मिमि. या टॅब्लेटची भारतातील किमत ४६९९० रूपये ठरविली गेली आहे.
कंपनीचे उत्पादन विभाग प्रमुख मुकेश श्रीवास्तव या विषयी अधिक माहिती देताना म्हणाले की हा टॅब्लेट धूळ व पाण्यापासून सुरक्षित आहे. १०.१ इंचाचा डिस्प्ले, अँड*ाईड ४.१ ऑपरेटिंग सिस्टिम, मागच्या बाजूला ८ मेगापिक्सल तर पुढच्या बाजूला २ मेगापिकसलचे कॅमेरे, १६ जीबी मेमरी व अतिरिक्त १६ जीबीचे मेमरी कार्ड अशी याची अन्य वैशिष्ठ्ये असून या टॅब्लेटचे वजन आहे ४९५ ग्रॅम.