
कोलकाता, दि.30 – राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक आणि अभिनेते ऋतुपर्णो घोष यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 49 वर्षांचे होते. घोष हे गेल्या अनेक दिवसांपासून ते स्वादुपिंडाच्या आजारानेही त्रस्त होते. घोष यांनी बंगाली आणि हिंदीमध्ये यशस्वी चित्रपटांचं दिग्दर्शन केले आहे. अबोहोनम’ या बंगाली चित्रपटासाठी त्यांचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. घोष यांच्या कारकिर्दीला जाहिरात क्षेत्रापासून सुरुवात झाली. यानंतर ते चित्रपटसृष्टीकडे वळाले. ऋतुपर्णो यांनी 19 चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यामध्ये त्यांनी तब्बल 12 राष्ट्रीय पुरस्कार पटकावले.