
माद्रिद दि.२९ – ब्रह्मांडाचा विस्तार आणि ब्रह्मांडातील घटकांचे वेगाने होत असलेले विघटन यामुळे भविष्यात सूर्य आणि सूर्यासारखे अन्य प्रखर तारे लोप पावतील किंवा त्यांचे अस्तित्व संपेल असे मत पदार्थविज्ञानातील नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ ब्रायन श्मिट यांनी व्यक्त केले आहे. अर्थात हे घडून येण्यासाठी किमान पाच अब्ज वर्षे जावी लागतील असे त्यांचे म्हणणे आहे.
अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ असलेले श्मिट सध्या ऑस्ट्रीयात वास्तव्यास आहेत. २०११ मध्ये त्यांनी अॅडमरीज आणि पर्लमॅटर या अन्य दोन वैज्ञानिकांच्या साथीत केलेल्या संशोधनातून ब्रह्मांडाचा विस्तार होत असल्याचे सिद्ध केले होते आणि त्याबद्दलच त्यांना नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले होते.
श्मिड यांच्या मते संशेाधकांपुढील यापुढचे सर्वात मोठे आव्हान असेल ते अंधःकारातील उर्जेचा शोध घेणे. कारण ब्रह्मांडातील ७० टक्के भाग अंधःकारमय आहे आणि त्यावरच पुढचे संशोधन होणे आवश्यक आहे.