लवकरच भारत आणि कॅनडा दोन देशातील व्यवसाय १ ५ अब्ज डॉलर

पुणे दि २ ९ : भारत आणि कॅनडा या दोन देशातील व्यवसाय २ ० १ ५ पर्यंत १ ५ अब्ज डॉलर होईल असा विश्वास कॅनडाचे वाणिज्य प्रतिनिधी रिचर्ड बाले यांनी ्यक्त केला आहे . त्यांच्या हस्ते मंगळवारी रिन्युटेक २ ० १ ३ या प्रदर्शनाचे उदघाटन पिंपरी चिंचवड मधील ऑटो क्लस्टर येथे झाले. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली .

भारतात कॅनडातील ७ ० ० उद्योग कार्यरत आहेत यावरून उभय देशातील व्यापार संबंध किती आहेत हे असे नमूद करून ते म्हणाले की व्यापक आर्थिक सहकार्याचा करार दोन्ही देशात करण्याचा निर्णय झाला होता त्यानुसार सध्या ५ . ८ अब्ज डॉलर असलेला व्यापार सहा अब्ज डॉलर वाढणार आहे . त्यात उर्जा क्षेत्राचे मोठे योगदान असेल. मात्र त्याकरता उभय देशातील तांत्रिक मनुष्यबळ एकत्र येणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन कॅनडाने एक कोटी १ ३ लाख डॉलर मदत दिली असून त्यातून संशोधन केंद्र यंदा स्थापन केले जाणार आहे. दोन्ही देशातील तज्ञांनी एकत्र संशोधन करावे हा त्यामागचा हेतू आहे
यावेळी सोलर एनर्जी कॉर्पोरेशनचे संचालक अश्वनी कुमार म्हणाले की अक्षय उर्जेचा एकूण उर्जा निर्मितीतील वाटा दोन टक्के आहे तो यंदा १ २ टक्के करण्याचे उद्दिष्ट आहे,

Leave a Comment