‘नकारात्मक’ भूमिकांचा संकोच नाही – श्‍वेता तिवारी

– छोट्या पडद्यावर कायम एका चांगल्या मुलीची भूमिका साकारलेली टीव्ही अभिनेत्री श्‍वेता तिवारी हिची नकारात्मक भूमिकांनाही पसंती आहे. नकारात्मक भूमिका करण्याबाबत आपल्याला संकोच वाटत नाही, परंतु दुर्दैवाने तशा भूमिका आपल्याला देऊ केल्या जात नाहीत, अशी खंत श्‍वेता बोलून दाखवते.

‘सांस बहू’ ही मालिका भारतीय प्रेक्षकांना कायम आवडत राहील, असा विश्‍वास श्‍वेताने एका वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केला. ‘कसौटी जिंदगी की’ या टीव्ही मालिकेतही तिने सुनेची भूमिका केली आहे. ‘कसौटी जिंदगी’मधील प्रेरणापेक्षा वेगळय़ा भूमिका मिळणार असतील तर अशा मालिकांमध्ये काम करायला आपल्याला आवडेल, असे तिने सांगितले.

श्‍वेता लवकरच ‘झलक दिखला जा’ या डान्स रिअँलिटी शोमध्ये दिसणार आहे. हा शो आपल्या अन्य शोंच्या तुलनेत (‘नच बलिये’) वेगळा असेल असा आशावाद तिने
व्यक्त केला. मोना सिंह, प्राची देसाई व गुरमीत यांच्यासारख्या टीव्ही कलाकार याआधी या शोमध्ये विजेत्या ठरल्या आहेत. श्‍वेताच्या मते या शोमध्ये विजयी होण्यास बिगरव्यावसायिक नर्तक -नर्तिकांना मोठा वाव आहे. विनोदी कलाकार सुरेश मेनन हाच आपला स्पर्धक असल्याचे ती मानते. सुरेश फारसा चांगला नर्तक नसल्याने तोच हा शो जिंकेल असा आपल्याला विश्‍वास असल्याचे तिने नमूद के ले.

Leave a Comment