दाक्षिणात्य अभिनेत्रीला दिल्लीत अटक

नवी दिल्ली, दि.28 – दक्षिणेतील आघाडीची अभिनेत्री – मॉडेल लीना मारिया- पॉल हिला शस्त्र वापरल्याचा व फसवणुक केल्याच्या गुन्ह्याखाली दिल्लीत अटक करण्यात आली. तिच्याकडून तब्बल ११ कार जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

मूळची चेन्नईची असलेली लीना मारिया सध्या दिल्लीत बालाजी चंद्रशेखर याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होती. टॉलिवूडमध्ये लीनाचा चांगलाच प्रभाव आहे. बॉलिवुडमध्येही ती नशीब आजमावत आहे. रेड चिल्लीज, कोब्रा आणि थाऊजंड्स इन गोवा अशा काही चित्रपटांमधील तिच्या भुमिका चर्चेत राहिल्या आहेत. जॉन अब्राहमची प्रमुख भुमिका असलेल्या व प्रदर्शनाच्या मार्गावर असलेल्या मद्रास कॅफे या चित्रपटात ती झळकणार आहे.

Leave a Comment